विविधतेने नटलेल्या आपल्या देशात, समान नागरी कायदा आणण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल!
आपल्या मनात असे एक पक्के झाले आहे की, देशात एकात्मता, एकता आणण्यासाठी समान कायदा हवा. त्याने राष्ट्र मजबूत होईल. अशा वेळी मला अमेरिकेचे उदाहरण द्यावेसे वाटते. अमेरिका हा देश अनेक राज्यात विभागलेला आहे. प्रत्येक राज्याचे कायदे व घटनाही वेगवेगळी आहे. पण त्या देशाला आपण फुटीरतेने ग्रासलेले म्हणू शकू का, तो देश ताकदवर नाही, असे म्हणता येईल का?.......